वाहनधारकांनो इकडे लक्ष द्या, हॉर्न वाजवताय? तुम्ही पोलिसांच्या रडारावर; अशी शाळा
Horns cause a lot of noise pollution : हॉर्न वाजवाल तर आता पोलीस शाळा घेणार आहेत. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी तसे आदेशच काढले आहेत.
मुंबई : Horns cause a lot of noise pollution : हॉर्न वाजवाल तर आता पोलीस शाळा घेणार आहेत. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी तसे आदेशच काढले आहेत. विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांना दंड ठोठावण्यात येणार आहे. शिवाय त्यांना अद्दल घडवण्यासाठी 3 तास पोलीस चौकीत बसवून वाहतूक नियमांचे धडे गिरवावे लागणार आहेत. त्यानंतर त्यांची परीक्षाही घेणार आहे.
मुंबईच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी जागोजागी दिसून येत असते आणि प्रत्येकालाच पुढे जाण्याची घाई असल्याचे चित्र अनेक रस्त्यांवर दिसते. यावेळी गाडीचे हॉर्न वाजवून साईट काढण्याच्या नादात सातत्याने हॉर्न वाजवला जातो. तर कधी पुढच्याला डिवचण्याची अनेकांना सवय असते. पण आता ही सवय मात्र मुंबईकरांना मोडावी लागणार आहे. आता विनाकारण हॉर्न वाजवाल तर पोलीस तुमची शाळा घेतील. सतत हॉर्न वाजवणाऱ्या चालकांना आता दंडासोबत वाहतूक नियमांचे धडेसुद्धा गिरवावे लागणार आहेत.
पोलीस कारवाईही होणार
सतत वाजणाऱ्या हॉर्नमुळे ध्वनीप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे गरज नसताना जर का हॉर्न वाजवला जात असेल, तर पोलीस त्याला वाहतुकीचे नियम शिकवणार आणि सोबत दंडही वसूल केला जाणार जाईल. नियम शिवल्यानंतर त्यांची परीक्षाही घेतली जाणार आहे. त्यामुळे आता वाहनधारकांना हॉर्नला प्राधान्य द्यायचे की हॉर्नला ते तुम्हीच ठरवा.
रुग्णवाहिकांवरही होणार कारवाई
विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्याला पोलीस हॉर्न कधी वाजवतात कधी नाही याचे धडे देणार आहेत. तसेच, तीन ते साडेतीन तास बसून वाहतुकीच्या नियमांचे धडे गिरवावे लागणार आहेत. रात्री अपरात्री रस्ते मोकळे असतानाही विनाकारण सायरन वाजवणाऱ्या रुग्णवाहिकांवरही कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून पावले उचलण्यात येत आहेत.