मुंबई : वाहन नोंदणीवरचा कर २ टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. जीएसटी लागू झाल्याने महसूल तूट होणार आहे. तेव्हा उत्पन्न वाढवण्य़ासाठी हा निर्णय सरकारने घेतलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाहनाचं रजिस्ट्रेशन करताना एक रकमी कर घेतला जातो. त्यात २ टक्के वाढ करण्यात आलीय. सर्वच वाहनांसाठी कमाल कर मर्यादा २० लाख रूपये ठेवण्यास मान्यता देण्यात आलीय. जास्त किंमत असणारी वाहने राज्याबाहेर नोंदणी आणली जातात. हे टाळण्यासाठी सर्वच वाहनांसाठी मोटार वाहन कराची उच्चतम कर मर्यादा 20 लाख रुपये एवढी ठेवण्यात येणार आहे.


दुचाकी आणि तीनचाकीवरील कर ८ ते १० टक्के या दरम्यान होता. त्यामध्ये वाढ होऊन आता १० ते १२ टक्के कर लागणार आहे. पेट्रोल कारवरील कर ९ ते ११ टक्के या दरम्यान होता, तो आता ११ ते १३ टक्के कर होणार आहे. डिझेल कारवरील कर ११ टक्के ते १३ टक्के या दरम्यान होता. त्यावर आता १३ ते १५ टक्के याप्रमाणे कर लावण्यात येणार आहे. सी.एन.जी. आणि एल.पी.जी. कारवरील कर ५ ते ७ टक्के या दरम्यान होता तो आता ७ ते ९ टक्के होणार आहे.