व्हिडिओ : धावत्या रेल्वेसोबत अल्पवयीन मुलांचा जीवघेणा स्टंट
हार्बर मार्गावर अल्पवयीन मुलं स्टंट करत असतानाचा एक व्हि़डीओ समोर आलाय
मुंबई : धावत्या लोकलमध्ये स्टंट करु नका, जीवावर बेतू शकतं, असं वारंवार आवाहन करुनही स्टंट करण्याचे प्रकार सुरुच आहेत. हार्बर मार्गावर अल्पवयीन मुलं स्टंट करत असतानाचा एक व्हि़डीओ समोर आलाय. १० ते १५ वर्ष वयोगटातील ही चार मुलं आहेत. मस्जिद बंदर ते सँडहर्स्ट रोड स्टेशन दरम्यान ही मुलं स्टंट करत होते. धावत्या लोकलमध्ये स्टंट करताना खाली पडून किंवा खांब लागून काही जणांचा मृत्यू झालाय. रेल्वे पोलीस अशा मुलांवर कारवाईही करत आहेत. मात्र तरीही असे स्टंट करण्याचे प्रकार कमी होत नाहीत.