Video : मुंबईकरांचा Swag वेगळा! ती लोकलमध्ये चढली आणि मग...
Mumbai Local Video : ...म्हणून म्हणतात मुंबईकरांचा Swag वेगळा आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे.
Mumbai Local Trending Video : मुंबईकराचं लाईफ लाईन (Life line) म्हणजे लोकल (Local)...एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मुंबईकर (Mumbaikar) हे लोकलचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. कोरोना काळात मुंबई लोकल ट्रेन जेव्हा बंद होती तेव्हा जणू काही मुंबईकरांचा श्वास थांबला होता. सोशल मीडियावर लोकल ट्रेनचे (train Video) अनेक व्हिडिओ पाहिला मिळतात. लोकलच्या डब्यातील गणपती असो किंवा भजन मंडळी...मुंबईकर लोकलमध्ये आपलं छोटंस जग जगतात. असाच एक मुंबई लोकल ट्रेनचा व्हिडिओ (Local video) सोशल मीडियावर (Social media) नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.
मुंबईकरांचा Swag वेगळा!
सकाळच्या वेळी ऑफिसला जाण्याची घाई असते तेव्हा आणि संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर लोकलमध्ये तुफान गर्दी असते. मुंबईकरांच्या सेवेत एसी लोकल ट्रेनचाही समावेश झाला आहे. पण त्यांची संख्या कमी, अशा मग गर्दी तर होणारच ना. सोशल मीडियावर व्हायरल (video viral) झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक महिला एसी लोकलमध्ये चढली. पण गर्दीमुळे तिला फूटबोर्डवर लटकून उभं राहवं लागलं. आता ही एसी ट्रेन दरवाजे लागले नाही तर ट्रेन पुढे जाणार नाही. मग काय...
मुंबईकरांसोबत पंगा नहीं लेने का!
महिला ट्रेनमधून उतरायला तयार नाही. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे कर्मचारी आले तरी ती महिला कोणाला ऐकत नव्हती. अखेर ट्रेन गार्डने तिला समजविण्यासाठी पुढाकार घेतला. या मॅडमला अखेर VIP ट्रीटमेंट देण्यात आली. या महिलेला मोटरमन केबिनमध्ये बसून प्रवास करण्यास विनंती करण्यात आली. मग काय मॅडम उतरल्या आणि थेट केबिनमध्ये जाऊन बसल्या. अखेर लोकल ट्रेन सुटली आणि मुंबईकरांनी सुटकेचा श्वास घेतला. (video mumbai local train ac local woman trabeled from motormans cabin)
कुठली आहे घटना?
खरं तर मोटरमनच्या केबिनमध्ये (Motorman cabin) कोणालाही बसण्याची परवानगी नाही. मात्र चालकाजवळ कुठल्याही पर्याय नव्हता. ही घटना बोरिवली (Borivali) स्थानकावर गुरुवारी सकाळी 8.30 च्या सुमारास घटली. ही ट्रेन चर्चगेटला (Churchgate) जाणारी होती.