प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : माणूस किती क्रूरतेचे वागू शकतो याचं धक्कादायक उदाहरण वसईतील (Vasai) एका घटनेनंतर समोर आलं आहे. झोपेत असलेल्या पत्नीला उठवून एक्सप्रेस ट्रेन (Express Train) खाली ढकलल्याचा धक्कादायक प्रकार वसई रेल्वे स्थानकात समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धावत्या एक्सप्रेवर पत्नीला फेकून पतीने तिची कृरपणे हत्या केली आहे. या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 


वसई रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या पत्नीला पतीने ट्रेन खाली ढकलून दिलं. या घटनेत त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या घटनेचा संपूर्ण थरार कैद झाला आहे. पत्नीला ट्रेन खाली ढकलून सोबत असलेल्या दोन मुलांसोबत पतीचे तिथून पळ काढला.


सोमवारी पहाटे 4 च्या सुमारास वसई रेल्वे स्थानकात पत्नी झोपेत असताना पतीने तिला अचानक उठवले. त्यांनतर अचानक भरवेगात येणाऱ्या एक्सप्रेस मेल ट्रेन खाली त्याने पत्नीला ढकलून दिल्याचे सीसीटीव्ही दृश्यांमध्ये दिसून येत आहे.



या व्यक्तीसोबत त्याची दोन मुलेही असल्याचेही दिसून येत आहे. पत्नीला ट्रेन खाली ढकलल्यानंतर त्याने दोन्ही मुलांना घेऊन पळ काढला. आरोपी पळून जाताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. 


दरम्यान, वसई रेल्वे पोलिसांकडून या आरोपीचा शोध घेतला जात आहे.