Mumbai Local News in Marathi : मुंबईची लोकल म्हणजे लाइफलाइन. याच लोकलमधून दररोज लाखो प्रवाशांची ये-जा होत असते. अशातच मुंबई लोकलमधून नेहमीच कोणते ना कोणते व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी मारामारीचे असता तर कधी भांडणाचे असतात. तर कधी लोकलमधून रिल्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल करतात. धावत्या लोकलमध्ये रिल्स करणारे सध्या रेल्वेच्या रडारवर आले आहेत. अनेकजण इंटरनेटवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात. त्यामुळे सोशल मीडियाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. काही लोक प्रसिद्धीसाठी काहीही करताना दिसतात. स्वतःच्या जीवाला धोक्यात टाकून व्हिडीओ करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये लहानपांसूनच मोठ्यांपर्यंत सर्वच सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत.  असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका तरुणीने रील बनवण्यासाठी चक्क मुंबईतील धावत्या लोकलत्या बाजूला उभी राहून डान्स करते तर दुसरी महिला प्लॅटफॉर्मवर ट्रेन येत असताना व्हिडीओ बनवत आहेत. हे व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रेल्वे ट्रॅकच्या बाजूला एक महिला उभी आहे. ट्रेन येताच ट्रेनच्या दारात उभ्या असलेल्या प्रवाशांना हात दाखवून डान्स करत आहे. मात्र यावेळ तिचा तोल जाऊन अपघात होण्याचीही भीती आहे. तर दुसरीकडे या व्हिडीओमध्ये तुम्ही एका महिलेला पाहू शकता की, पश्चिम मार्गावरील मालाड रेल्वे प्लॅटफॉर्मवर एक महिला नाचतेय, तेवढ्यात पाठीमागून गाडी येते अन् तिच्यामुळे खाली उतरणाऱ्या प्रवाशांना गैरसोय होते. 



हा धोकादायक प्रकार पाहून मुंबईकर प्रचंड संतापले आहेत. या महिला स्वतः बरोबर दुसऱ्याचा ही जीव धोक्यात घालात आहेत. मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर नाचणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. आतापर्यंत  बाजारात, मेट्रोमध्ये डान्स करणाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल होत होता. मात्र आता मुंबईच्या लोकल संबधित ही व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


अशी असेल कारवाई 


जर धावत्या ट्रेनमध्ये किंवा प्लॅटफॉर्मजवळ प्रवास करताना सेल्फी घेणे, रील काढणे किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करणे, एखाद्याचा जीव धोक्यात घालणे हे रेल्वे कायदा 1989 च्या कलम 145 आणि 147 अंतर्गत दोषी मानले जातात. ज्या अंतर्गत किमान एक हजार रुपये दंड आणि 6 महिने कारावासाची तरतूद आहे. त्याच वेळी, जर तुम्ही रेल्वे प्लॅटफॉर्मवर पिवळी लाईन ओलांडली तर तुम्हाला 500 रुपये दंड होऊ शकतो. याव्यतिरिक्त, तुम्हाला एक महिन्यासाठी तुरुंगात पाठवले जाऊ शकते. रेल्वे कायद्याच्या कलम 147 नुसार रेल्वे रूळ ओलांडणे हा देखील गुन्हा आहे.