मुंबई :  राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ८ लाख ६३ हजार ६२ वर पोहचली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्याचं पावसाळी अधिवेशन येत्या ७ आणि ८ सप्टेंबर रोजी होणार आहे. या अधिवेशनात काही निर्बंध घालण्यात आले आहेत. पावसाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात प्रेक्षकांना प्रवेश नाकारला जाणार आहे तर आमदारांच्या पीएना देखील प्रवेश नाकारण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवाय मंत्रीमंडळापासून सर्वच कर्मचारी अधिकारी वर्गाला कोरोना टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे. तशी व्यवस्था विधान भवन परिसरात करण्यात आली आहे मात्र नियोजन शून्य कारभारामुळे गर्दी पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असून या चाचणी दरम्यान करोनाचा संसर्ग वाढणारतर नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. विधानसभेचं अधिवेशन दोन दिवसांवर आलं आहे. अशात विधानसभा अध्यक्षांचाच अहवाल पॉझिटिव्ह आल्याने, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वाखाली  अधिवेशनाचं कामकाज चालणार आहे. 


७ आणि ८ सप्टेंबरला विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन होणार आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत अनेक आमदारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दोन दिवसीय अधिवेशनात आवश्यक ती खबरदारी घेतली जाणार आहे.