मुंबई : राज्यसभा निवडणुकीनंतर (Rajyasabha Election) आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते विधान परिषद निवडणुकीकडे (Vidhan Parishad Election). येत्या 20 जूनला 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधानपरिषद निवडणुकीतही महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपमध्ये (BJP) थेट लढत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपाने या निवडणुकीत 5 तर अपक्ष म्हणून सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना उभं केलं होतं. पण अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी भाजपाच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या सदाभाऊ खोत यांनी अर्ज मागे घेतला आहे. खोत यांनी अर्ज मागे घेतल्याने आता भाजपचे 5 अधिकृत उमेवदवार विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात असतील. भाजप नेते देवेंद्र फडवणीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपण अर्ज मागे घेत असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.


सदाभाऊ खोत यांच्याबरोबर शिवाजीराव गर्जे यांनीही निवडणुकीतून माघार घेतली आहे. म्हणजे आता विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदावर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या महाविकास आघाडीकडून 6 तर भाजपकजून 5 उमेदवार असणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे प्रत्येकी 2 उमेदवार उभे आहेत. भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड हे पाच उमेदवार आहेत. 


विधानपरिषदेत निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची 27 मते आवश्यक आहेत. भाजपकडे 106 इतकं संख्याबळ असल्याने पहिले 4 उमेदवार सहज निवडून येतील. तर पाचव्या जागेवरील उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला तजवीज करावी लागणार आहे. हीच परिस्थिती लक्षात घेऊन भाजपने सदाभाऊ खोत यांना अर्ज मागे घ्यायला लावला.