मुंबई :  विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाने आपापले आमदार वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवले आहेत. काँग्रेसने आपले आमदार वरळी इथल्या फोर सिझन हॉटेलमध्ये ठेवले आहेत. हॉटेलबाहेर दोन बस तैनात असून काँग्रेसचे सारे आमदार या दोन बसने विधानभवनात दाखल होतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे आणि भाई जगताप हे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी दोन उमेदवार सहज जिंकून आणू शकतात. तर काँग्रेसही  एक आमदार सहज जिंकून आणू शकतो.


मात्र काँग्रेसला आपला दुसरा उमेदवार विधानपरिषदेत निवडून आणण्यासाठी अतिरिक्त 10 मतांची गरज आहे. आता काँग्रेस ही 10 अतिरिक्त मत जमवण्यात यशस्वी ठरते का हे सायंकाळी निकालानंतर स्पष्ट होईल.


फोर सिझन हॉटेलबाहेर दोन बस तैनात


राज्यसभेसाठी काँग्रेसचे आमदार सर्वात प्रथम विधानभवनाकडे रवाना झाले होते. आजही सर्वात प्रथम काँग्रेसचे आमदार विधानभवनाकडे रवाना होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे 44 आमदार असून आमदारांना विधानभवनात नेण्यासाठी दोन बसेस वरळी इथल्या फोर सिझन हॉटेलबाहेर तैनात ठेवण्यात आल्या आहेत.