`विनय दुबेचा मनसेशी काडीचाही संबंध नाही`
२०१८ साली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उत्तर भारतीय मंचातर्फे एका कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले होते.
मुंबई: वांद्रे स्थानकाच्या परिसरात गर्दी जमविण्याच्या घटनेमागील कर्ता करविता असलेला विनय दुबे (Vinay Dubey) सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. विनय दुबेने कोणाच्या सांगण्यावरून ही गर्दी जमवली, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. या सगळ्या चर्चेदरम्यान विनय दुबे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कनेक्शन असल्याचीही एक वदंता होती. मात्र, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
वांद्रे गर्दीप्रकरणी विनय दुबेला पोलीस कोठडी
२०१८ साली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उत्तर भारतीय मंचातर्फे एका कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा आयोजक विनय दुबे होता. ही एक गोष्ट वगळता मनसेचा आणि विनय दुबेचा काहीही संबंध नसल्याचे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले. विनय दुबे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून २०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूकही लढवली होती.गेल्याच आठवड्यात दुबे यांचे वडील जटाशंकर यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून कृतज्ञता म्हणून रुपये पंचवीस हजाराचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता सुपूर्द केला होता. यावरुनही बऱ्याच उलटसुलट चर्चा सुरु आहेत.
लॉकडाऊनमध्येही वांद्रे स्टेशनवर गर्दी, अफवा का षडयंत्र?
दरम्यान, मुंबईत कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दक्षिण मुंबईतील आदर्श इमारत आणि शिवाजी पार्क येथील जुन्या महापौर निवासाचा वापर करण्यात यावा, असा प्रस्तावही देशपांडे यांनी मांडला. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सर्वकाही आलबेल असल्याचे सांगतात. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही ठोस माहिती दिली जात नाही. सरकारकडून कोरोना रुग्णांची आकडेवारी प्रसिद्ध केली जाते. मात्र, सरकारी अधिकारी कितपत खरी माहिती सांगत असतील, अशी शंकाही यावेळी संदीप देशपांडे यांनी उपस्थित केली.