मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं निधन झालं आहे. आज सकाळी झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. सकाळी 5.30 वाजताच्या सुमारास त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. यामध्ये विनायक मेटे गंभीर जखमी झाले होते. मुंबई पुणे एक्सप्रेस वे-वर ही घटना घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या गंभीर अपघातानंतर विनायक मेटेंना पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.


डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक मेटे यांचं अपघातस्थळीच निधन झालं होतं. याशिवाय त्यांच्या डोक्याला आणि छातीला मार लागला होता. 


मिळालेल्या माहितीनुसार, मेटे यांच्या गाडीने अनोळखी वाहनाला धडक दिली. 


या भीषण अपघातात विनायक मेटेंचा सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.