शिक्षणमंत्र्यांकडे दीड दिवसाच्या श्रीगणेशाचे आगमन
विनोद तावडे यांनी ` ट्री गणेशा ` या संकल्पनेवर आधारित इको फ्रेंडली गणेश मूर्तीची स्थापना केली आहे.
मुंबई : शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या ' सेवासदन ' या निवासस्थानी मिरवणूक काढत वाजतगाजत दीड दिवसाच्या श्रीगणेशाचे आगमन झाले. मिरवणुकीत विनोद तावडे सहकुटुंब सहभाग झाले होते. विनोद तावडे यांनी ' ट्री गणेशा ' या संकल्पनेवर आधारित इको फ्रेंडली गणेश मूर्तीची स्थापना केली आहे.
------------
राज्याच्या ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मुंबईतल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मुंडे यांचे पती, मुलं, आई, बहीण यावेळी उपस्थित होते. पंकजा मुंडे यांच्या घरी पाच दिवस गणपती असतो. पाचही दिवस त्या घरी गणपतीची पूजा आणि त्याच्यासाठी नैवेद्य तयार करतात.