मुंबई : विनोद तावडे यांना बोरिवलीतून भाजपाने तिकिट दिलेलं नाही. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. आपल्याला तिकिट का मिळालं नाही, किंवा आपली पुढची भूमिका काय असेल हे स्पष्ट करण्यासाठी विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्रकार परिषदेत  बोलताना विनोद तावडे म्हणाले, मी विद्यार्थी परिषदेतही काम केलं आहे. मी आरएसएसचा स्वंयसेवक आहे. यामुळे सध्या निवडणूक जिंकणं हे डोळ्यासमोर आहे, तिकिट का मिळालं नाही, या प्रश्नाचं उत्तर मी पक्षश्रेष्ठींना नक्कीच विचारणार आहे. पण निवडणुकांनंतर, कारण समाज कारण करणे महत्वाचं आहे, आमदारकी, खासदारकी, हे समाजकारण करताना मध्ये लागणारी स्टेशन्स आहेत


तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा यांनीही माझ्या तिकिटासाठी प्रयत्न केले. पण पक्षात तिकिटावर निर्णय घेण्यासाठी अंतर्गत एक पार्लमेंन्ट्री बोर्ड असतं, त्यांचा हा निर्णय आहे, तो कोणत्या आधारावर घेतला गेला, यापेक्षा तो मान्य करावा लागेल, असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.