मुंबई : पेपरफुटी झाल्यानंतर सगळ्या राज्यात पेपर बदलता येणार नाही... मात्र, जिथे पेपर फुटला तिथेच पेपर बदलण्याचा विचार केला जाईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी विधान परिषदेत केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासाठी वेगळा प्रश्नपत्रिकांचा संच छापला जाईल आणि जिथे पेपर फुटेल त्या ठिकाणी या संचातील पेपर पोहचवला जाईल. याबाबत शिक्षण मंडळशी चर्चा करू असं तावडेंनी घोषित केलं. विधानपरिषदमध्ये पेपरफुटी प्रकरणावर अल्पकालीन चर्चा करण्यात आली, तेव्हा शिक्षणमत्र्यांनी ही घोषणा केली. 


पेपरफुटी प्रकरणी दोन शिक्षकांना अटक


गेल्या आठवड्यात मुंबईतही दोन खाजगी कोचिंग क्लास शिक्षकांना एसएससी बोर्डाच्या पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आली होती. साकीनाकातील एका शाळेतील विद्यार्थ्यांकडे विज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका पेपर सुरु होण्याच्या २० मिनिटे अगोदर त्यांच्या मोबाइलमध्ये असल्याचा त्याच शाळेतील एका शिक्षिकेला संशय आला आणि ही बाब तिने पोलिसांना कळवली. त्यानंतर या पेपरफुटी प्रकरणात सकिनाका पोलिसांनी चौकशी करून दोन खाजगी कोचिंग क्लास घेणाऱ्या शिक्षकांना अटक केली होती. यामध्ये फिरोज अन्सारी ह्या सकिनाका भागात कोचिंग क्लास घेणाऱ्या शिक्षकला तर दुसरा मुज्जमिल काझी हा मीरा रोड भागात खाजगी कोचिंग क्लास घेणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला पोलिसांनी काल अटक केली आहे.