Mumbai : लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन, सात जन्माचं नातं. असं म्हणतात की लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. मुलगा आणि मुलीला आपल्या जीवनसाथीकडून मोठ्या अपेक्षा असतात. उच्चशिक्षित, चांगला पगार आणि सुखी जीवन असावं असं प्रत्येक मुला-मुलीचं स्वप्न असतं. पण अनेकवेळा आपल्या जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या जातात. आणि लग्नानंतर त्या पूर्ण झाल्या नाहीत की अपेक्षाभंग होतो आणि त्यातूनच घटस्फोटासारख्या प्रकार होतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या मुलीचं प्रोफाईल व्हायरल
सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा (Bride) प्रोफाईल व्हायरल होतोय. अंबर नावाच्या मुलाने सोशल मीडिया X अकाऊंटवर दोन स्पॅनशॉट शेअर केले आहेत. या तरुणीने आपला होणारा पती कसा असावा, याच्या अटीच ठेवल्या आहेत. त्या वाचून सोशल मीडियावर युजर्स चांगलेच हैराण झाले आहेत. ही तरुणी मु्ंबईत नोकरी करणारी आहे या तरुणीने आपला प्रोफाईल  मेट्रोमोनियल साईटवर (Matrimony Sites)अपलोड केला आहे. यासोबत तीने आपला जोडीदार (Groom) कसा असावा याची लिस्टच शेअर केली आहे.


जोडीदाराकडून अपेक्षा
या तरुणीने दिलेल्या अटीनुसार होणारा जोडीदाराचं मुंबईत स्वत:चं घर असावं, नोकरी किंवा व्यवसाय करणारा असावा, मुलहा आणि मुलाचं कुटुंब उच्चशिक्षित असावं. मुलगा सर्जन (डॉक्टर) किंवा चार्टर्ड अकाऊंटंट असला तर चांगलंच. मुलाचा पगार जवळपास एक कोटी रुपये इतका असावा, मुलगा युरोपात राहाणारा असेल तरी चालेल, युरोपमध्ये इटली असले तर चांगलंच. 


कोण आहे ही तरुणी?
ज्या तरुणीने मेट्रोमोनियल साईटवर आपला प्रोफाईल अपलोड केला आहे ती तरुणी 10 वर्ष मुंबई नोकरी करते आणि तिचा वार्षिक पगार चार लाख रुपये इतका आहे. या तरुणीने प्रोफाईल पोस्ट केल्यानंतर याला जवळपास 6 लाख हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 4400 लाईक्सही आहेत. या तरुणीच्या पोस्टवर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. 



लोकांच्या प्रतिक्रिया
एका युजरने लिहिलंय, आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार भारतात 1.7 लाख लोकांचं उत्पन्न एक करोडहून अधिक आहे. त्यामुळे 37 वर्षांच्या या मुलीला आपल्या स्वप्नातील जोडीदार मिळण्याची शक्यता 0.01% इतकी आहे. तर दुसऱ्या युजरने म्हटलंय असे प्रोफाईल मुलींच्या आई-वडिलांकडून बनवले जातात. त्यांच्या अपेक्षा जरा जास्तच असतात. एका युजरने म्हटंलय, 37 वर्षांच्या मुलीवर भरपूर कर्ज असेल आणि हे कर्ज फिटवण्यासाठी तिला चांगला पगार असणारा नवरा हवा.