उबर ड्रायव्हरचं लोकेशन चक्क अरबी समुद्रामध्ये !
आज 21 व्या शतकामध्ये टेक्नॉलॉजीने आपलं आयुष्य बर्याचशा प्रमाणात सुकर केले आहे. आवडीच्या रेस्टॉरंटमधून जेवण मागवणं असो किंवा अगदी अपरात्री मोबाईलच्या माध्यमातून गाडी बुक करणं असो, सारे काही अवघ्या एका क्लिकवर उपलब्ध झाले आहे.
मुंबई : आज 21 व्या शतकामध्ये टेक्नॉलॉजीने आपलं आयुष्य बर्याचशा प्रमाणात सुकर केले आहे. आवडीच्या रेस्टॉरंटमधून जेवण मागवणं असो किंवा अगदी अपरात्री मोबाईलच्या माध्यमातून गाडी बुक करणं असो, सारे काही अवघ्या एका क्लिकवर उपलब्ध झाले आहे.
पूर्वी इच्छित स्थळी जाण्यासाठी टॅक्सी, रिक्षा चालकांसोबत हमखास भांडण होत असे. परंतू आता अॅपच्या माध्यमातून टॅक्सी बुक करणं शक्य असल्याने अनेकजण आयत्या वेळेस टॅक्सी बुक करतात.
मुंबईत घडला अजब प्रकार
मुंबईत 15 फेब्रुवारी रोजी हुसेन शेख याने उबर अॅपच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्याला अस्माल या टॅक्सी ड्रायव्हरच्या गाडी चक्क अरेबियन समुद्रामध्ये असल्याचं दिसलं.
हुसेनने हा प्रकार स्क्रिनशॉर्टमध्ये कैद केला आहे. मुंबईच्या हिंदीमध्ये त्याने खास कॅप्शन दिले आहे. यामध्ये ' अस्लम भाई सबमरीनसे आरेला है' असं लिहलं आहे. यानंतर ही पोस्ट व्हायरल झली आहे.
टेक्निकल ग्लिच
उबर अॅपमध्ये मॅप आणि नेव्हिगेशन दाखवताना हा टेक्निकल ग्लिच आलेला आहे. हा पहिलाच प्रकार नव्हे. काही दिवसांपूर्वी 'ओला'वरही असाच अजब प्रकार घडला होता. बॅंगलोर ते कोरिया या प्रवासासाठी चक्क 'ओला' बूक केली.