मुंबईच्या वडापावला टक्कर देणार गुजरातचा आईस्क्रीम पाव; Video पाहाच
Mumbai Cha Vadapav : वडापावचं नाव ऐकल की तोंडाला पाणी सुटतं. वडापाव जणू मुंबईकरांची ओळखच आहे. वडापावची क्रेझ आता जगभर पाहायला मिळते. पण तुम्हाला कोणी विचारलं, वडापावऐवजी आईस्क्रीम पाव खाल्लायं का? त्यावेळी तुमची प्रतिक्रीया काय असू शकते.
Vadapav vs IceCream Pav News in Marathi : गरमागरम वडापाव म्हणजे मुंबईकरांची जान... वडा पाव म्हटलं की चटकन तोंडाला पाणीच सुटतं.. कहींना तर वडापावसोबत हिरवी मिरणी आणि लाल चटणी खायला खूप आवडते. मुंबईत अनेक ठिकाणी वडा पाव वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. जसे की जंबो वडा पाव, भाऊचा वडा पाव, लक्ष्मण वडा पाव अशा विविध प्रकारच्या वडापावसाठी प्रसिद्ध आहे. पण तुम्ही कधी वडा पाव ऐवजी आईस्क्रीम पाव खाल्ला आहे का? आता मुंबईचा वडा पावला गुजरातचा आईस्क्रीम पावाला टक्कर देणार आहे. सध्या सोशल मीडियावर वडापावऐवजी आईस्क्रीम पावची जोरदार चर्चा सुरू आहे. गुजरातमधील एक व्यक्ती आईस्क्रीम पाव बनवत आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकांनी तर या पदार्थांची रेसिपी पाहून डोक्याला हातच लावला आहे.
स्ट्रीट फूडच्या नावाखाली बाजारात कोणतेही पदार्थ बनवले जातात. कोणी बिस्किटांची भजी विकतेय तर कोणी मिरच्यांचं आईस्क्रिम करून विकतेय, कोणी चॉकलेट पाणी पुरी बनवतेय तर कोणी गुलाबजाम दहीमध्ये मिक्स करून खातेय. हे सगळं कमी होतं म्हणून की काय आता एक नवा पदार्थ समोर आलाय. या पदार्थाला ‘आईस्क्रिम पाव’ असं म्हणतात. आतापर्यंत तुम्ही वडा पाव, भजी पाव, समोसा पाव असे पदार्थ खाल्ले असतील. पण आईस्क्रीम पाव कधी खाल्ला नसणार.. आता मात्र बाजारात आईस्क्रीम पाव आला आहे. हा पदार्थ बनवण्यासाठी सर्वात आधी पावांना बटर लावण्यात आले. मग त्यावर थंड आईस्क्रीमचा तुकडा ठेवला. त्यानंतर आईस्क्रीम पाव तयार...
मात्र गुजरातमधील आईस्क्रीम पाव हा पदार्थ फारसा नेटकऱ्यांना आवडलेला नाही दिसत. व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. या पदार्थाची किंमत 100 रुपये आहे. आईस्क्रीम आणि पाव कोण खातं का? अशी प्रतिक्रीया देऊन नेटकऱ्यांनी फिरकी घेतली आहे.