मुंबई : उन्हापासून बचाव करण्यासाठी तुम्ही दुकानातील लिंबू-पाण्याचा आधार घेत असाल तर सावधान... कुर्ला रेल्वे स्थानकातील रेल्वेच्या दुकानात लिंबू सरबत बनवणाऱ्याची दृश्य समाज माध्यमांमध्ये पसरलीत. यात लिंबू सरबत बनवताना अशुद्ध पाण्याचा वापर केला जात होता. इतकच नव्हे तर लिंबू सरबत बनवणाऱ्यानं स्वत:चे हातही त्या सरबतामध्ये धुतले. हा सर्व प्रकार एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा प्रकार समाज माध्यमांमध्ये पसरल्यानंतर स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी तातडीनं त्या रेल्वे अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. रेल्वे प्रशासनानं ताबडतोब ठेकेदाराचं हे दुकान बंद करुन टाकलं आणि संबंधीत कामगारावर गुन्हा दाखल केला.


मुंबईतील वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावर ठेक्याने घेतलेले स्टॉलसुद्धा बंद करण्याची मागणी शिवसैनिकांनी केलीय.