मुंबई पोलिसांनी असा साजरा केला आपल्या मित्राचा वाढदिवस (व्हिडिओ)
मुंबई पोलीस म्हटलं की आठवते ती कडक शिस्त...
मुंबई : मुंबई पोलीस म्हटलं की आठवते ती कडक शिस्त...
पण या पोलिसांच्याही मनात एक निरागसता आहे. एक साधेपणा आहे. आणि हेच वेगळेपण सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओतून व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आहे मुंबई पोलिसांचा. मुंबई पोलिसांनी आपल्यातील एका दोस्ताचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे.
मुंबई पोलिसांच्या बँड पथकाने हॅप्पी बर्थ डे आणि बार बार दिन ये आये... सारखी गाणी वाजवून हा वाढदिवस साजरा केला. या वेळी मुंबई पोलिसांबरोबर ट्रॅफिक पोलीस देखील होते. यावेळी प्रत्येकाने या आपल्या पोलीस मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हा व्हिडिओ 2 फेब्रुवारी रोजी जहांगिर वकील यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 13 हजार व्हिव्ज्स मिळाल्या असून 190 वेळा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ नेमका कुठचा याची अद्याप माहिती मिळालेली नाही.