Marine Drive Viral Video : मरिन ड्राईव्ह म्हणजे मुंबईकरांच्या हक्काचा कट्टा.. कोणी एक मुंबईला (Mumbai) आला अन् मरिन ड्राईव्हला गेला नाही, असं होणार नाही. जगप्रसिद्ध असं मरिन ड्राईव्ह सर्वांसाठी (Marine Drive) खास आहे. अनेक दिग्गज कलावंत असो वा राजकारणी सर्वांसाठी मरिन ड्राईव्ह म्हणजे काळजाचा विषय. काहीजम मॉर्निंग वॉकसाठी येतात. तर काहीजण ताणतणावातून मुक्त होण्यासाठी मरिन ड्राईव्हवर येऊन बसतात. अशातच आता मरिन ड्राईव्हवरील एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मरिन ड्राईव्हवर सुरक्षा व्यवस्था एकदम कडक असते. पाण्यापासून सुरक्षित अंतर ठेवा, असं वारंवार सांगण्यात येतं. तरुणांमध्ये सेल्फीचं वेड असल्याने अनेकजण इथं फोटोशूट करतात. गावाकडून आलेल्या तरुणांमध्ये देखील मोठी क्रेझ असते. अशातच एका तरुणाचा व्हिडीओ (Mumbai Viral Video) सध्या व्हायरल झालाय. यामध्ये एक तरुण कट्ट्यावरून उतरून थेट रचण्यात आलेल्या त्रिकुटी दगडांवर पोहोचला. त्याठिकाणी तो फोटोशुट करू लागला. मात्र, पोलिसांनी पाहिलं अन् तरुणाला धडा शिकवला.


व्हिडीओमध्ये दिसतंय की, तरुण दगडांवर मस्ती करताना दिसतोय. त्यानंतर पोलिसांनी तरुणाला वर बोलवलं अन् जाब विचारला. तरुणाने चूक मान्य केली पण पोलिसांनी (Mumbai Police) त्याला पुशअप्स काढायला लावल्या. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी यावर भन्नाट कमेंट केल्या आहेत. हा भाऊ पुन्हा काय पाण्याच्या जवळ जात नसतो, असं एकाने कमेंट करत म्हटलंय. 



दरम्यान, हा व्हायरल व्हिडीओ 3 मार्चचा असल्याचं सांगितलं जातंय.  हा व्हिडीओ @yogesh_shankopal_since_1997 या अकाऊंटवर शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आत्तापर्यंत 64 हजार लाईक्स आले आहेत.  तर 13 लाख जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. त्यामुळे तुम्हीही मरिन ड्राईव्हला गेल्यावर काळजी घ्यावी, अशी विनंती केली जात आहे.