COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : रेल्वे प्रवासात  थकवा घालण्यासाठी गरमागरम, वाफाळलेला फक्कड चहा पिण्याला हमखास पसंती दिली जाते. अशा अस्सल चहाबाजांसाठी बातमी महत्त्वाची आहे. रेल्वेत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाबद्दल नेहमीच प्रश्न उपस्थित करण्यात येतात. आता मात्र तुमच्या  ग्लासातला चहा पाहिल्यावर तो गरमागरम चहा प्यावा की न प्यावा? हा प्रश्न तुम्हालाही नक्की पडेल. याला कारण ठरलाय सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडिओ... वाफाळत्या चहासाठी चक्क टॉयलेटमधील पाण्याचा वापर करण्यात आलाय. 


रेल्वेच्या टॉयलेटमधून चहाचं भांडं बाहेर आणताना युनिफॉर्ममधील चहावाला स्पष्ट दिसतोय. ही दृष्य़ं सिकंदराबाद स्टेशनवरची असून चार महिन्यांपासून हा व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनानं संबंधित वेंडरवर कारवाई केलीय.


विशेष म्हणजे, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळल्याबद्दल फक्त एक लाखाचा दंडही ठोठावण्यात आलाय. पण हा व्हिडिओ समोर आल्याने रेल्वेमध्ये नेमकं कुठल्या दर्जाचे पाणी आणि अन्न वापरलं जातं, याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनो यापुढे प्रवासामध्ये तुम्ही खबरदारी घ्या.