मुंबई : गुरुवारी मध्यरात्री लोअर परेल भागातील कमला मिल कंपाऊंटमध्ये असलेल्या मोजो बिस्ट्रो लाऊंजमध्ये लागलेल्या आगीत १५ जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर २१ हून अधिक जण जखमी झालेत. जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, या घटनेनंतर शहराचे प्रथम नागरिक असलेले महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी यावर वादग्रस्त प्रतिक्रिया दिलीय. सगळं काही पाहणं माझ्यासाठी शक्य नाही... आम्ही प्रत्येक ठिकाणी असू शकत नाही, असं म्हणत त्यांनी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलाय. 


'प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत. कुणीही अधिकारी असेल तरी त्यावर कारवाई व्हायला हवी... चौकशीनंतर याची जबाबदारी कुणाची आहे, हे समजेलच' असंही महाडेश्वर यांनी म्हटलंय.
 
मात्र, यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी मुंबई महानगरपालिकेलाही जबाबदार धरलंय. या मृत्यूंसाठी भ्रष्टाचारी जबाबदार आहेत. जर बीएमसी टॅक्स वसूल करत असेल तर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारीही त्यांची आहे. ते आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाहीत, असं सिंह यांनी म्हटलंय.


मृतांची नावं...


प्रीती राजानी, तेजल गांधी, कविता  धोरानी, किंजल शहा, प्रमिला केनिया, शेफाली जोशी, पारुल, खुशबू, मनीषा शाह, प्राची शाह, प्राची खेतान, यश ठक्कर, सरबजित परेडा, धैर्य ललानी अशी या घटनेतील मृतांची नावं आहेत.