Vishwas Mehendale Passes Away : जेष्ठ अभिनेते, लेखक, दूरदर्शनवर पहिले मराठी वृत्तनिवेदक म्हणून कारकीर्द गाजविणारे डॉ. विश्वास मेहेंदळे (84) यांचे आज (9 डिसेंबर) सकाळी मुलूंड येथे निधन  झाले.  डॉ. विश्वास मेहेंदळे गेल्या दोन  ते तीन महिन्यापासून ते आजारी असल्यामुळे ते त्यांच्या मुलीकडे राहत होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवर आजच मुलुंड येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. 10 जुलै 1939 रोजी त्यांचा जन्म झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. विश्वास मेहेंदळे हे दिल्ली आकाशवाणीवरून मराठी बातम्या वाचणार  ते पहिले निवेदक ठरले होते. तसेच ते मुंबई दूरदर्शनचे पहिल वृ्त्तनिवेदकही ठरले आहेत. तेथेच ते संचालक म्हणूनही काम कार्यरत राहिले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचा पदभारही त्यांनी सांभाळला होता. साहित्यिक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होतीय. आपले पंतप्रधान, मला भेटलेली माणसे, नरम गरम हा कथासंग्रह अशा 18 पुस्तकांचे लेखन त्यांनी केले होते. सुरूवातीच्या काळात पुण्याच्या आणि कुलाब्याच्या वेधशाळेमध्ये त्यांनी काम केले. 


मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत डॉ.विश्वास मेहंदळे यांना श्रद्धांजली वाहीली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की,”दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक, ज्येष्ठ संपादक, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे माजी संचालक तसेच प्रसिद्ध लेखक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.”



विश्वास मेहंदळे यांनी काही नाटकांमध्येही भूमिका केल्या आहेत. जसे की, कंसात त्यांच्या भूमिकेचं नाव दिलं आहे. अग्निदिव्य (अप्पा), एकच प्याला, एक तमाशा अच्छा खासा (प्रधान), खून पहावा करून, जर असं घडलं तर (इन्स्पेक्टर), नांदा सौख्यभरे, पंडित आता तरी शहाणे व्हा (पंडित), प्रेमा तुझा रंग कसा (प्रो. बल्लाळ), भावबंधन, मगरूर (अण्णा), मृत्युंजय (शकुनी), लग्न ( भाई), शारदा, सासूबाईंचं असंच असतं (सहस्रबुद्धे), स्पर्श (अप्पा), स्वरसम्राज्ञी (भैय्यासाब) आदी नाटकांत भूमिका केल्या आहेत.