Vodafone Idea 4G in Mumbai : जर तुम्ही मुंबईत राहतायत, आणि तुमच्याकडे आयडीया-वोडाफोनचं सीएमकार्ड आहे, तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण तुमच्या 4G नेटवर्कची स्पीड वाढणार आहे. टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडियाने (Vodafone Idea) मुंबईत 4G चा स्पीड वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. आपली सेवा सर्वोत्तम होण्यासाठी त्यांनी 3G स्पेक्ट्रमचा वापर सुरु केला आहे. पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार, कंपनीचं म्हणणं आहे की, स्पेक्ट्रम रिफॉर्मिंग झाल्यानंतर 4G चा स्पीड वाढणार आहे.


डेटा सर्व्हिसचा स्पीड वाढला आहे Data service speed increased


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने आज दिलेल्या वक्तव्यात म्हटलेलं आहे, कंपनी 2100 मेगाहर्टझच्या स्पेक्ट्रमचा वापर कंपनी आता 3G साठी करीत होती, पण आता हा स्पेक्ट्रम 4G साठी वापरण्यात येणार आहे. कंपनीने म्हटलं आहे की, यामुळे डेटा सर्व्हिसचा स्पीड वाढणार आहे. तसेच कस्टमर्सना आपल्या घरात बसून चांगला स्पीड मिळत असल्याचा फीड बॅक कंपनीकडे आहे.


3G कस्टमर्सना सिम बदलण्याचं आवाहन 3G customers appeal to change SIM


वोडाफोन आयडियाचे मुंबई ऑपरेशनचे निर्देशक राजेंद्र चौरसिया यांनी आपल्या कस्टमर्सना 3G चं जुनं सिम बदलून नवं 4G सिम वापरण्याचं आवाहन केलं आहे. महत्त्त्वाचं म्हणजे, जुनं बदलून नवं सिम घेण्यासाठी कोणताही खर्च लागणार नाहीय. कंपनी हा निर्णय अशा वेळेस घेत आहे जेव्हा, २१०० मेगाहर्टझचं बँडचा स्पेक्ट्रम हा 5G नेटवर्कसाठी देखील लावला जात आहे. तसेच आयडिया वोडाफोन मुंबईत आपली 2G सेवा कायम ठेवणार आहे.


कंपनी देतेय डबल डेटा ऑफर Company offers double data offer


वोडाफोन-आयडिया आपल्या कस्टमर्सना डबल डेटा ऑफरसह काही निवडक प्लान देते, यात प्रत्येक दिवशी डबल डेटा दिला जातो. जर कोणत्या प्लानवर प्रत्येक दिवशी डेटा मिळत असेल, तर या ऑफरनुसार कस्टमर्सना  डेटा मिळतो. कंपनीचे २९९, ४९९ आणि ६९९ हे प्लान कस्टमर्सकडून जास्त घेतले जातात.