मुंबई : राज्यातील १४ जिल्ह्यांमधील ६७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर दोन ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुका होत आहे. या निवडणुकीसाठी ३१ ऑगस्ट २०१९ रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. ही निवडणूक जाहीर झाल्याने निवडणूक क्षेत्रात आचारसंहिता आजपासून लागू झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१ ऑक्टोबर ते १३ डिसेंबर २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नवनिर्मित अशा एकूण ६७ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. सर्व ठिकाणी नामनिर्देशनपत्रे ९ ते १६ ऑगस्ट २०१९ या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी १९ ऑगस्ट २०१९ रोजी होईल. 


नामनिर्देशनपत्रे २१ ऑगस्टपर्यंत मागे घेता येतील आणि त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजता या वेळेत  मतदान होईल. मतमोजणी ३ सप्टेंबर २०१९ रोजी होईल. 


जिल्हानिहाय संख्या : एकूण - ६७


ठाणे - ६, 
रायगड - ९, 
रत्नागिरी - ४, 
सिंधुदुर्ग - ३, 
नाशिक  - २५
धुळे - १, 
सातारा - ४, 
सोलापूर - १, 
कोल्हापूर - १, 
उस्मानाबाद - ३, 
अकोला - २, 
यवतमाळ - १, 
वर्धा - ५, 
चंद्रपूर - २