कृष्णात पाटील, मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : सरकार आणि महापालिकेकडून अनुदान थकल्यानं महिनाभरापासून  मॅटर निटी रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना पगार नाही. केवळ महिनाभर टिकतील, एवढीच औषधं शिल्लक आहेत. निवृत्त कर्मचाऱ्यांना एक महिन्यापासून पेन्शन मिळालेलं नाही. या विरोधात कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वच राजकीय पक्षांनी वाडिया वाचवण्यासाठी आंदोलन केलं. मात्र वाडिया रुग्णालय बंद होणार नाही, तोडगा काढण्यासंदर्भात सरकारशी बातचीत सुरू असल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.


माध्यमांनी प्रश्न उचलल्यानंतर आणि आंदोलन पेटल्यानंतर अखेर मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. अनिल परब आणि रुग्णालय प्रशासन यांच्यात बैठक झाल्याचं कळतं आहे. महापालिकेकडून  थकीत अनुदानाची काही रक्कम तातडीनं देण्यात येणार आहे. सर्वस्तरांतून प्रयत्न जलदगतीनं व्हायची गरज आहे. एकही बाळ उपचाराविना राहायला नको. 


दरम्यान वाडियाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वाडिया बंद होणार नसल्याची माहिती दिली आहे. औषध आणि आपात्कालीन गॅस संपत आल्यामुळे नोटीस लावावी लागल्याचं सांगण्यात आलं. तसंच जबाबदारीपासून पळ काढत नसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.