सुस्मिता भदाणे, झी २४ तास, मुंबई : ११ वर्षीय मुलाच्या फुफ्फुसात घड्याळाची बॅटरी अडकल्याचा प्रकार समोर आला होता. पण डाँक्टरांनी यावर यशस्वी शस्त्रक्रिया करत ती बाहेर काढली आहे. जसलोक हॉस्पिटलमध्ये ही किचकट वाटणारी शस्त्रक्रिया करण्यात आली. सोमवारी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करत भरती केल्याच्या २४ तासामध्ये चिमुकल्यास बरे करून घरी सोडण्यात आले. त्यामुळे जसलोक हॉस्पिटल मधील डॉक्टरांचे कौतूक होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


घरामध्ये खेळत असताना एका ११ वर्षीय मुलाच्या फुफ्फुसातून डिजिटल घड्याळाचा सेल अडकला होता. काही क्षणातच त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मुलाने जुन्या घड्याळाशी खेळता खेळता सेल गिळला असावा अशी शंका पालकांना आली आणि त्यांनी ताबडतोब जसलोक रुग्णालय गाठले. रविवारी रात्री मुलाला जसलोक हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तेंव्हा त्याला खोकला आणि श्वासोच्छ्वासास त्रास होत होता. डॉक्टरांनी एक्स-रे मार्फत सेल शोधला पण सेल फुफ्फुसामध्ये असल्याचे देखील यावेळी निदर्शनात आले.   


बॅटरी अत्यंत धोकादायक असल्याने त्यात विविध विषारी पदार्थ असतात. हा सेल फुफ्फुसात जाऊन फुटला आणि त्यातून एसिड बाहेर येऊन ते इतर भागामध्ये पसरत होते. यामुळे अन्ननलिकेमध्ये जळजळ होऊ लागली. योग्य वेळेत औषधोपचार न केल्यास असे प्रकार जीवावर बेतण्याचा संभव असतो. या चिमुकल्यांच्या फुफ्फुसात देखील यामुळे न्युमोनिया होण्याची शक्यता होती. या सर्वाचा अंदाज घेऊन यावर जलदगतीने शस्त्रक्रिया करण्यात आली


मुलगा केवळ ११ वर्षांचा असल्यामुळे डॉक्टरांसमोर हे देखील एक आव्हान होते. तो श्वास घेत असताना देखील ब्राँकोस्कोपी स्वयंचलितपणे ऑपरेट करायची होती. मुलाला श्वास घेण्यास मदत करण्यासाठी 'एंडोट्राचेल ट्यूब' नावाच्या लवचिकव प्लास्टिकच्या नळीला तोंडामध्ये बाजूला ठेवण्यात आले होते.



दूरच्या वातनलिका आणखी विचलित होण्याचा धोका पत्करण्याशिवाय सेल एंडोट्राचेल ट्यूबमधून बाहेर आला नसता. जेथे ब्रोन्कोस्कोप पोचणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत शस्त्रक्रिया करून सेल काढून टाकणे हाच एकमात्र पर्याय होता. फुफ्फुस शस्त्रक्रियेद्वारे उघडण्यात आले आणि सेल बाहेर काढण्यात आल्याचे श्वसन औषधांचे सल्लागार डॉ. हरीश चाफले यांनी झी २४ तास ला सांगितले.