Mumbai Local Viral Video : सोशल मीडियाने सध्या नेटकऱ्यांना वेड लावलं आहे. रोज सेकंद सेकंदला या सोशल मीडियावर अनेक रील्स (social media Reels) आपल्याला पाहिला मिळतात. एखाद्या गाण्यावर डान्स करण्याचा ट्रेंड (trend Video) येतो आणि सोशल मीडियावर बघावं तिकडे फक्त त्याच ट्रेंडचे व्हिडीओ दिसतात. या रील्सचं वेड तरुणाईला नाही तर लहान मुलांनाही लागलेलं दिसत आहे. मुंबई लोकल ट्रेनमध्ये (Mumbai Local Train) महिलांचा राडा दाखवणारे अनेक व्हिडीओ (trending Video) सोशल मीडियावर पाहिला मिळतात. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होतं असलेला व्हिडीओ पाहून आपल्याला नक्कीच धक्का बसतो. 


तिचं हे कृत्य अंगावर काटा आणणारं!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सार्वजनिक ठिकाणी कुठेही आजकाल मोबाईल फोनसोबत नेटकरी रील्स काढताना दिसतात. एक लहान मुलगी या व्हिडीओमध्ये स्टेशनवर लोकलच्या समोर डान्स करताना दिसतं आहे. अती उत्साहात ती मुलगी डान्स करत असते. तिने कधीही विचारही केला नसेल की पुढच्या क्षणी तिच्यासोबत काय त्याची तिला कल्पनाही नसते. (watch trending Video girl was making Reel in front of Mumbai Local and then Viral Video on social media)


साधारण 10 - 12 वर्षांची ही मुलगी लोकल समोर डान्स करत असते. कोणी तरी तिचा व्हिडीओ काढत असतो. मुलगी मोठ्या उत्साहात डान्स करत असते तेवढ्यात लोकलचा हॉन वाजतो आणि ती घाबरते...तो हॉनचा आवाज इतका क्रर्कश असतो की ती मुलगी घाबरून तिथून पळून जाते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by @dharmendra.bilotia_


अन् ती मुलगी...


हो, त्या आवाजाने तिच्या रील्सचा बंड वाजतो.  हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर dharmendra.bilotia या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत अनेक व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारोच्या संख्येत लाईक्सही मिळाले आहेत. रील्ससाठी नेटकरी कुठल्याही थराला जातं आहे. अगदी जीवाची पर्वा न करता प्रसिद्धीसाठी जीवघेणा स्टंटही ते करतात. या मुलीसोबत झालं तर गंमतीशीर होतं. पण अशाप्रकारे लोकल ट्रेनच्या बाजूला व्हिडीओ बनवणे हे तिला महागात पडू शकलं असतं.