मुंबई : जर तुम्हाला सुट्टीत धबधब्यांची मजा लुटायची असेल तर तुम्हाला मुंबई बाहेर जायची गरज नाही. कारण मध्य रेल्वेने ही सुविधा भांडूपच्या रेल्वे  फलाटावर उपलब्ध करून दिलेली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संध्याकाळी फक्त अर्धा तास पडलेल्या धुवाधार पावसामुळे भांडूपमध्ये 2 नंबर रेल्वे फलाटावर छापरांवरील पाणी पन्हाळ्या मधून न जाता थेट फलाटावर पडून  धबधबा  सुरु झाला होता की त्यामुळे प्रवाश्यांना  मात्र या धबधब्यातून मार्ग काढत आपल्या घरची वाट धरावी लागली.


पावसाळ्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने डागडुजीची कामे किती जोमाने केली याची प्रचिती यावरुन दिसून येत आहे. चाकरमानी मात्र या रेल्वेच्या कामावर प्रचंड नाराज  असल्याची प्रतिक्रिया दिली.