Navi Mumbai News : राज्यात जानेवारी महिन्यातच अनेक ठिकाणी पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असताना नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. दरवर्षी पाणी प्रश्नाला सामोरे जाणाऱ्या नवी मुंबईकरांना यंदा पाणी समस्यातून सुटका झाली आहे. नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात ऑगस्टपर्यंत पुरेल एवढा साठा आहे. सध्या मोरबे धरणात 66 टक्के पाणीसाठा शिल्लक असून नवी मुंबई पालिकेनुसार हा साठा 25 ऑगस्टपर्यंत नवी मुंबईकरांना पुरणार आहे. तरीदेखील नवी मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे असं आवाहन महापालिकेने केला आहे.  (water issue Navi Mumbai is solved No matter how long the summer falls there is water in the dam here until the rainy season)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरावती जिल्ह्यात पाणीटंचाई


यंदा उन्हाळ्यात अमरावती जिल्ह्यातील 776 गावांना पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यताय...त्यासाठी पाणीपुरवठा विभागाने 21 कोटी 18 लाखांचा आराखडा मंजूर केलाय...त्यामुळे आता पाणीटंचाईची कामं करण्याचा मार्ग मोकळा झालाय....दरम्यान मेळघाटात दरवर्षी सरकारने केलेल्या उपाययोजना फेल ठरतात...


हेसुद्धा वाचा - 'या' शहरावर पाणी संकट! मार्चपर्यंत पुरेल एवढ्याच साठा असल्याने आजपासून पाणीकपात


पंढरपुरात पाणी समस्या


पंढरपूर शहराला एक दिवसा आड पाणीपुरवठा होणारेय. पाऊस कमी झाल्यानं उजनी धरणात पाणी साठा कमी आहे. धरणात मार्चपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याची माहिती प्रशासनानं दिलीय.त्यामुळे नागरिकांना तसंच भाविकांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागणारेय.