Social Media: सोशल मीडिया म्हणजे व्हायरल व्हिडीओंचं व्यासपीठ. सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्याला हसू आवरता येत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल. नेटकरी हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. या व्हिडीओतून मुंबईच्या पावसाची स्थिती आधोरेखित करण्यात आली आहे. मुंबईत ठिकठिकाणी पावसामुळे पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईकरांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एक व्यक्ती रस्त्यावर साठलेल्या पाण्यात आरामात झोपल्याचं पाहायला मिळत आहे. तर बाजून जाणाऱ्या बसमुळे लाटांचा फील येत आहे. ती व्यक्तीही आरामात झोपून पाण्याचा आनंद लुटत आहे. हा व्हिडीओ मुंबईतील मालाडमधील असल्याचं नेटकरी शेअर करताना लिहित आहे. 



फेसबुकवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओखाली नेटकरी आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, "तुम्ही मालाडला मालदीवचा आनंद घेऊ शकता". तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, "मालाडचा मालदीव करून दाखवलं".