मुंबई : ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये मुंबईतील काही भागांमध्ये ११ नोव्हेंबरला  पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलवाहिनीच्या दुरूस्तीच्या कामांसाठी बृहमुंबई महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ७ विभागातील नागरिकांना १० नोव्हेंबरला पाण्याचा पुरेसा साठा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय पाणी जपून वापरण्याचे आवाहन देखील पालिकेने केले आहे. मुंबईच्या ७ विभागांमध्ये ११ नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विभागांमध्ये ए विभाग, ई विभाग, बी विभाग, एफ उत्तर, एफ दक्षिण, एम पूर्व, एम पश्चिम या भागांचा समावेश आहे.  त्यामुळे नगरिकांनी सदर भागातील नागरिकांनी १० नोव्हेंबरला पाण्याचा पुरेसा साठा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे? 
ट्रॉम्बे निम्नस्तर जलाशयावरील सी.जी.गिडवाणी मार्ग, रामकृष्ण चेंबूरकर मार्ग, सह्याद्री नगर, कस्तुरबा नगर, अजिज बाग, अयोध्या नगर, म्हाडा नगर, भारत नगर, आणिक गाव, विष्णू नगर, प्रयाग नगर, आणि गवाण पाडा, साई बाबा नगर, शेल कॉलनी, सिद्धार्थ कॉलनी, पोस्टल कॉलनी, एचपीसीएल,  बीपीसीएल, आरसीएफ, बीपीटी, टाटा पावर, रामकृष्ण चेंबूरकर मार्गावरील मारवाली चर्च, आंबापाडा, माहुल गाव, म्हैसूर कॉलनी, वाशी गाव, माहूल पीएपी, मुकुंद नगर एसआरए, लक्ष्मी नगर, कलेक्टर कॉलनी, सिंधी सोसायटी, चेंबुर कॅम्प, चेंबुर नाका ते सुमन नगर मधील सायन-ट्रॉम्बे लगतचा भाग, परळ गाव, शिवडी पश्चिम आणि पूर्व, हॉस्पिटल झोन, काळे वाडी, कोकरी आगार, ऍन्टोपहील, वडाळा, गेट क्र.४, कोबरा मिठागर, बीपीटी, डोंगरी ए झोन, वाडी बंदर, सेंन्ट्रल रेल्वे झोन, बीपीटी झोन, डॉकयार्ड झोन, हाथीबाग व हुसैन पटेल मार्ग आणि माऊंट रोड झोन, जे.जे. हॉस्पिटल, नेवल डॉक आऊटलेट झोन, सेंट जॉर्ज हॉस्पिटल या भागांमध्ये ११ नोव्हेंबर रोजी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.