मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी बोलवले. यावर प्रतिक्रिया देताना सोमैया म्हणाले, शरद पवार आणि ठाकरे अशा माफियाखोरांना मदत करत असतात. म्हणून आता ते संजय राऊत यांचीच भाषा बोलत आहेत. ईडी म्हणजेच किरीट सोमैया हे त्यांचे म्हणणे चूक आहे. पण, तेच शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या १९ बंगल्याबाबत बोलत नाहीत. कोविड घोटाळ्याबाबत एक शब्द बोलत नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे जनतेला भ्रमित करत आहेत. नवाब मलिक यांना पहिल्यापासून सर्व प्रकार माहित आहेत. ज्याने बॉम्बब्लास्ट करून मुंबई उद्धवस्त केली त्याचे कनेक्शन मंत्र्याकडे येत आहे. मी घोटाळे बाहेर काढतो. महाराष्ट्राच्या लोकांचा माझ्यावर विश्वास बसलं आहे म्हणून ते अनेक प्रकरणे माझ्याकडे आणून देतात. नाही तर ही माहिती मला कशी मिळाली असती, असा सवाल त्यांनी केला.


नवाब मलिक यांचे एक एक कारस्थान आता बाहेर येत आहेत. ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माहित नाही का? तरीही ते काही करत नाहीत. मलिक यांच्यासारखी व्यक्ती मंत्री मंडळात राहू शकते का अशी विचारणा भाजपने केली,आहे. त्याचा विचार मुख्यमंत्र्यांनी करावा.


मलिक यांची चौकशी सुरु आहे. त्यामुळे आम्ही ईडीच्या निष्कर्षांची आता वाट पहात आहोत. मलिक यांचे घोटाळे बाहेर आल्यास अशी व्यक्ती मंत्रीमंडळात राहू शकत नाही ही मागणी घेऊन भाजप कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याचे ते म्हणाले.


राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांनी १९ बंगल्याप्रकरणी खोटे रेकॉर्ड का तयार केले? बेनामी संपत्तीचे कारण काय? याची चौकशी व्हावी, अशी मागणी केल्याची माहिती दिली.