मुंबई : सामान्यांसाठी लोकल सेवा लवकरच सुरु होणार असल्याचे संकेत राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून लोकल सेवा बंद आहे. काही विशेष लोकल फेऱ्या चालविण्यात येत आहे. सरकारी कर्मचारी, बॅंक आणि वकील तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. आता सर्वसमान्यांना लोकल सुरु करण्यात येणार आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून बंद असणाऱ्या लोकलमधून प्रवास करण्यासाठी महिला, वकील आणि खासगी सुरक्षा रक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान लवकरच सर्वसामान्य नागरिकांनाही प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकार लवकरच यासंबंधी निर्णय घेत मुंबईकरांना दिलासा देण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून तसे संकेत देण्यात आले आहेत. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तसे संकेत दिलेत. 



कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून बंद असणाऱ्या लोकलमधून प्रवास करण्यासाठी महिला, वकील आणि खासगी सुरक्षा रक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान लवकरच सर्वसामान्य नागरिकांना प्रवासाची परवानगी नव्हती. ती आता मिळण्याची शक्यता आहे. मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळेल असे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.  



दरम्यान, लोकल सर्वसामान्यांसाठी अद्याप बंद असल्यामुळे सर्व ताण रस्त्यांवर येत आहे. त्यामुळे कल्याण-शिळफाटा, पूर्व द्रुतगती महामार्ग, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर इथं कायमच वाहतूक कोंडी अनुभवायला येतेय. त्यातच अनेक ठिकाणी रस्ते किंवा पुलांची कामं कामं सुरू आहेत. काही रस्त्यांवर पडलेले खड्डे पाऊस थांबल्यानंतरही बुजविण्यात आलेले नाहीत. असं असताना वाहतूक पोलीस विभागाकडे केवळ ६७० अधिकारी आणि कर्मचारी असल्यामुळे त्यांची प्रचंड दमछाक होत असल्याचे दिसत आहे. महापालिकांनी मदतीला वाहतूक सेवक दिलेत. मात्र हे मनुष्यबळ अपुरे पडत असल्याचं चित्र आहे.