मुंबई : क्रेडाई - एमसीएचआयची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मुंबईत आयोजित करण्यात आली होती. यावेळी बांधकाम व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे आणि विकासक, बांधकाम क्षेत्राशी निगडीत उद्योग आणि त्यांच्या प्रोक्युरमेंट टीमबरोबर उत्तम संवाद साधता यावा, त्यातून विकासकांना कमी भावात माल मिळावा या उद्देशाने ‘WeProcure.in’ या वेब पोर्टलची घोषणा करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘WeProcure.in’ या वेब पोर्टलचा मुख्य उद्देश विकासकांना लागणार कच्चा माल आणि इतर सेवा पुरवणा-या भागीदारांबरोबर थेट संवाद साधणे आणि त्यातून योग्य किंमत मिळून, उत्तमोत्तम उत्पादने एका छताखाली येणे हा आहे.


तसेच सहाय्यक उद्योग क्षेत्राला एकाच छताखाली अनेक विकासक मिळतील. जेणेकरून मध्यस्त कोणी नसल्याने त्यांना कमी भावात आपला माल विकता येईल. विकासकही परवडणा-या भावात आवश्यक उत्पादने विकत घेऊ शकतील.