मुंबई : मुंबई लोकल संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना काही दिवस त्रास सहन करावा लागणार आहे. पालघर-वनागाव मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे पश्चिम रेल्वेच्या काही गाड्यांवर परिणाम होणार आहे. या गाड्यांमधील प्रवाशांना त्यांच्या सोयीसाठी जास्त थांबे देण्यात येणार आहे. ज्यामुळे 5 दिवस पश्चिम रेल्वेवरती ब्लॉक लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही देखील पश्चिम रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी असाल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणं महत्वाचं आहे की,  कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी हा ब्लॉक असणार आहे, जेण करुन तुमची गैरसोय होणार नाही.


हा ब्लॉक 24  फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान एक तासासाठी (सकाळी 10.10 ते 11.10 पर्यंत) असणार आहे. ब्लॉक दरम्यान काही गाड्या अंशतः रद्द राहतील.


कोणत्या गाड्यांवर परिणाम होईल


- ट्रेन क्रमांक 93013 चर्चगेट-डहाणू रोड लोकल केळवे रोड-डहाणू रोड दरम्यान रद्द राहील


- गाडी क्रमांक 93012 डहाणू रोड-विरार लोकल डहाणू रोड-केळवे रोड दरम्यान रद्द राहील


लांब पल्ल्याच्या गाड्यांचे काय होणार?


ट्रेन क्रमांक 12934 अहमदाबाद-मुंबई सेंट्रल कर्णावती एक्स्प्रेसला 24, 26, 27 आणि 28 फेब्रुवारी 2022 रोजी पालघर आणि विरार स्थानकांवर अतिरिक्त थांबे असतील. या ट्रेनला बोईसर आणि विरार स्थानकांवर 25 फेब्रुवारी 2022 रोजी अतिरिक्त थांबा असेल.


गाडी क्रमांक 12990 अजमेर-दादर सुपरफास्ट एक्स्प्रेसला 24, 26 आणि 28 फेब्रुवारी 2022 रोजी बोईसर आणि विरार स्थानकांवर अतिरिक्त थांबे असतील.


गाडी क्रमांक 09159  वांद्रे टर्मिनस – वापी एक्सप्रेसला 24 ते 28 फेब्रुवारी 2022 दरम्यान उमरोली स्थानकावर अतिरिक्त थांबा असेल


गाडी क्रमांक 22952 गांधीधाम-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेसला 25 फेब्रुवारी 2022 रोजी पालघर आणि विरार स्थानकावर अतिरिक्त थांबा असेल.


ट्रेन क्रमांक 12489 बिकानेर-दादर एक्स्प्रेसला 27 फेब्रुवारी 2022 रोजी बोईसर आणि विरार स्थानकावर अतिरिक्त थांबा असेल.