मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचा तिढा वाढत असताना आता ही लढाई कायदेशीर मार्गाकडे वळताना दिसते आहे. एकनाथ शिंदे गटाने मातोश्रीच्या नेतृत्वाला आव्हान दिल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक आवाहन केलं. शिंदे गटाने शिवसेनेशी का फारकत घेतली हे दर्शविणारे स्टेटस, वॉलपेपर समाज माध्यमांवर फिरताना दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माझं काय चुकलं? असा सवाल यातून करण्यात आला आहे. वेळोवेळी पक्षप्रमुखांना सर्व गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. पण त्याची दखल घेतली गेली नाही. अशा आशयाचे हे फोटो व्हायरल होत आहे.



शिवसेनेकडून आता बंडखोरांवर कारवाईची मागणी केली जात आहे. 16 आमदारांवर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्याकडून काय पाऊल उचललं जातंय. याकडे लक्ष लागून आहे. ही लढाई आता कोर्टात जाण्य़ाची शक्यता आहे.



एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जवळपास शिवसेनेचे 38 आमदार हे त्यांच्यासोबत गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत इतर काही अपक्ष आमदार देखील आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे पाठबळ असल्याचा दावा केलाय. याला उत्तर देण्यासाठी ठाकरे सरकारकडून कायदेशीर सल्ला घेतला जात आहे.