शेतकरी मोर्चा : काय आहेत शेतक-यांच्या मुख्य मागण्या?
शेतकऱ्यांचा मोर्चा आझाद मैदानात पोहोचला आहे. हा लॉंग मार्चचा हा शेवटचा टप्पा असून आज हा मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे. या शेतक-यांच्या मागण्या काय आहेत यावर एक नजर टाकूया.
मुंबई : शेतकऱ्यांचा मोर्चा आझाद मैदानात पोहोचला आहे. हा लॉंग मार्चचा हा शेवटचा टप्पा असून आज हा मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे. या शेतक-यांच्या मागण्या काय आहेत यावर एक नजर टाकूया.
शेतकरी मध्यरात्री आझाद मैदानात
शेतकरी मोर्चा सध्या सोमय्या मैदानामध्ये असून मध्यरात्री १२ नंतर मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने निघाला. १०वीच्या मुलांच्या परीक्षा आहेत, त्यांना अडचण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं अजित ढवळे यांनी सांगितलं.
सहा मंत्र्यांची समिती
आंदोलकांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. या समितीमध्ये एकूण ६ मंत्री असतील. चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा, सुभाष देशमुख हे मंत्री या समितीमध्ये असतील.