मुंबई : सर्वसामान्यांना लोकल प्रवास इतक्यात नाहीच, (Local Train) अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार (Shivaji Sutar) यांनी दिली आहे. मध्य रेल्वे-लोकल संदर्भात लोकांनी कुठल्याही अफवांवर लक्ष देऊ नये. सर्व सामान्यांसाठी लोकल सुरू होईल त्यावेळी आम्ही अधिकृत घोषणा करू, अशी माहिती देखील यावेळी शिवाजी सुतार यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकार सोबत आमचा समनव्य सुरू आहे-जवळपास आम्ही ९०% लोकल सेवा सुरू केली आहे. राज्य सरकारने सूचित केलेल्या विविध वर्गातील लोकांना आम्ही या पूर्वी लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 


वकील आणि त्यांच्या सोबत असणारे नोंदणीकृत क्लर्क यांना या आधी १ डिसेंबर पर्यंत लोकल ने प्रवास करण्याची मुभा होती राज्य सरकारे रेल्वे ला केलेल्या विनंती नुसार आता पुढील सूचना मिळे पर्यंत त्यांना लोकल ने प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे.


सर्व महिलांसाठी लोकलची दारे उघडण्यात आली आहेत. त्यासाठी वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. त्यानंतर पुढच्या टप्प्यात सर्वच प्रवाशांसाठी लोकलसेवा बहाल केली जाणार आहे. त्याबाबत राज्य सरकारच्या वतीने एक सविस्तर प्रस्ताव रेल्वेला देण्यात आला आहे. ही सेवा कशी बहाल करायची, याबाबत कृती आराखडा तयार करण्याचं काम राज्य सरकार आणि रेल्वे यांच्या समन्वयातून सुरू आहे.



रेल्वेने त्यादृष्टीने आधीच लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. सुमारे ९० टक्के लोकल सध्या धावत आहेत. या पार्श्वभूमीवर लोकल प्रत्यक्षात सर्वसामान्यांसाठी खुली कधी होणार, या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळालेलं नसून यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज दिलासा देणारी माहिती दिली.