मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल त्यांच्या आमदारकीचा अचानक राजीनामा दिला. अजित पवारांच्या या राजीनाम्यामुळे फक्त राष्ट्रवादीतच नाही तर राज्याच्या राजकारणातही खळबळ माजली आहे. विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवल्यानंतर अजूनही अजित पवार नॉट रिचेबल आहेत. त्यांचा फोनही बंद आहे. खुद्द शरद पवारांचाही त्यांच्याशी संपर्क होत नव्हता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार ना शरद पवारांच्या संपर्कात आहेत ना मुंबईत आहेत ना पुण्यात, मग अजित पवार नेमके आहेत तरी कुठे? असा प्रश्न निर्माण होत आहे. अजित पवार स्वत: येऊन आपली भूमिका का मांडत नाही? काही गंभीर कारण असल्यामुळे अजित पवार गप्प आहेत का? या सगळ्यासंदर्भात खुलासा का करत नाही असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.


अजित पवार हे नगर जिल्ह्यातील असल्याची माहिती रात्री मिळाली. नगर जिल्ह्यातील जामखेडच्या अंबालिका कारखान्यावर अजित पवार दाखल झाल्याची चर्चा होती मात्र तिथंही अजित पवार नसल्याची माहिती सकाळी पुढे आली. त्यामुळे अजित पवार गेले तरी कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.