मुंबई : जर तुम्ही कमी कालावधीसाठी पैसे गुंतवण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. सध्याच्या कोरोना काळात कमी कालावधीसाठी FD सुरु करण्यासाठीचा हा चांगला पर्याय आहे. इथे तुमचे पैसे सुरक्षित राहतात आणि FD चा कालावधी पुर्ण होताच तुम्हाला ठरलेली रक्कम परत मिळते. (Fixed Deposit For 6 months) 6 महिन्यांची FD योजना कशी सुरु करता येणार आहे ते सविस्तर जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात अशा अनेक खाजगी बँका आहेत ज्या 6 महिन्यांच्या कालवधीसाठी FD सुरु करण्याची सुविधा देत आहेत. आपण आपले पैसे SBI, PNB, HDFC Bank,Canara Bank,Kotak mahindra bank, Bank of Baroda आणि ICICI या बँकांमध्ये गुंतवू शकता.


देशात तुम्हाला कोणत्या बँका किती व्याज दर केवळ 6 महिन्यासाठीच्या FD साठी देणार आहेत,त्याची माहिती पुढीलप्रमाणे आहे. 


SBI Fixed Deposit (FD) Rates 


स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुम्ही  6 महिन्यांसाठी FD सुरु करु शकता. त्यासाठी तुम्हाला 3.90 एवढा व्याज दर मिळणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना ही बँक 4.40 एवढा व्याज दर देत आहे.


ICICI Fixed Deposit Interest Rates
ICICI बँक ग्राहकांना 3 टक्के व्याज दर मिळणार आहे.  6 महिन्यांच्या कालावधीसाठी ही बँक सामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांना  3 टक्के व्याज देत आहे.


HDFC Fixed Deposit Rates
खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक मानली जाणारी HDFC बँक ही सामान्य नागरिकांना  3.50 एवढं व्याज दर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना  4 टक्के एवढं व्याज दर देत आहे.


PNB Fixed Deposit Rates
पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना 6 महिन्यांच्या FD साठी  4 टक्के व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 4.50 एवढं व्याज दर मिळणार आहे.


Canara Bank FD Rates
कॅनरा बँक सामान्य नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकांना ही  6 महिन्याच्या कालावधीसाठी FD सुरु केल्यास 4 टक्के व्याज दर देत आहे.


Bank Of Baroda FD Rates


बँक ऑफ बडोदामध्ये ग्राहकांना 3.70 टक्के एवढं व्याज दर मिळत आहे.


Kotak mahindra bank
कोटक महिंद्रा बँक ग्राहकांना 3.25 टक्के एवढं व्याज दरची ऑफर देत आहे. इथे तुम्ही  6 महिन्यांसाठी FD सुरु करु शकता.