मुंबई : शाहरूख खान (Shah Rukh Khan)चा मुलगा आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणावरील जामीन याचिका आजपर्यंत म्हणजे 13 ऑक्टोबरपर्यंत टाळली आहे. ज्येष्ठ वकील अमित देसाई (Amit Desai) सेशन कोर्टात सोमवारी आर्यन खानच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. यामध्ये आर्यन खानचा पक्ष ते मांडणार आहे. अमित देसाई यांनी 2002 साली 'हिट ऍण्ड रन' प्रकरणात सलमान खानची बाजू मांडली होती. त्यामुळे आता अमित देसाई आर्यन खानला देखील ड्रग्स प्रकरणातून सोडवणार का? अशी चर्चा रंगली आहे. 


अमित देसाईंचं काय आहे सलमान खानशी कनेक्शन? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिट-अँड-रन प्रकरणात, कनिष्ठ न्यायालयाने सलमान खानला पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. ज्याला आव्हान देत अमित देसाई यांनी 2015 मध्ये सलमान खानला जामीन मिळावा म्हणून त्याचा खटला लढवला होता. सलमान खानला मे 2015 मध्ये 30,000 रुपयांच्या रकमेवर जामीन मंजूर करण्यात आला होता. सलमान खानचा बचाव करताना अमित देसाई म्हणाले होते, "तपास यंत्रणा अल्कोहोल आणि ड्रायव्हिंगचे आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा करण्याचा विचार करत होती. आणि साक्षीदारांच्या साक्ष खटल्याच्या हिशोबाने बनावट होत्या. ' 10 डिसेंबर 2015 रोजी सलमान खान सर्व आरोपातून मुक्त झाला. यावेळीही अमित देसाई त्याची केस लढत होते.



अमित देसाई सांभाळणार ही जबाबदारी?


आर्यन खानच्या प्रकरणात, त्याच्या जामीन अर्जात सहभागी असलेले वकील अमित देसाई म्हणाले होते, 'आम्ही न्यायालयाच्या सोबत आहोत. आर्यन खानकडे ड्रग्स प्रकरणात काहीही सापडले नाही. एनसीबीने गेल्या आठवड्यात जामीन अर्ज दाखल केला होता. त्यामुळे या याचिकेवर उद्या सुनावणी होऊ शकते. NCB च्या वतीने, विशेष वकील अद्वैत सेठना यांनी सर्व जामीन अर्जांना उत्तर देण्यासाठी वेळ मागितला होता.  13 ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी होईल असा निकाल देण्यात आला.


यापूर्वी वरिष्ठ वकील सतीश मनशिंदे यांनी न्यायालयात आर्यन खानच्या कोठडीचा बचाव केला होता. एनसीबीने आर्यन खानची पुढील कोठडी मागितली होती पण न्यायालयाने ती नाकारली आणि आर्यन खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सध्या तो आर्थर जेल रोड, मुंबई येथे आहे. आर्यन खानला 2 ऑक्टोबर रोजी एनसीबीने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजातून अटक केली. आर्यन खान सोबत NCB ने इतर 7 लोकांना अटक केली ज्यांच्याकडून ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.