मुंबई : राज्य सरकारने आज एक मोठा निर्णय़ घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परमबीर सिंग यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन हटवण्यात येणार असल्याची चर्चा होती. ती आज अखेर खरी ठरली आहे. परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांच्या जागी आता राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही घोषणा केली. परमबीर सिंग यांना गृहरक्षक दलाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोण आहेत हेमंत नगराळे


- मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे सन 1987 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. 


- हेमंत नगराळे हे 2016 मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त होते. 


-  2018  मध्ये त्यांची नागपूरला बदली झाली. 


- हेमंत नगराळे पोलीस महासंचालक (विधी आणि तंत्रज्ञान) म्हणून काम करत होते. 


- हेमंत नगराळे यांचा अजून १ वर्षे ७ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.


- नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना हेमंत नगराळे यांनी बँक ऑफ बडोदा या बँकेवरील दरोड्याची उकल दोन दिवसात केली होती. हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते.


हेमंत नगराळे हे मुंबई पोलीस आयुक्त झाल्यामुळे रजनीश शेठ यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची दबाबदारी देण्यात आली आहे.