मुंबई : अनेक बॅंकांना चुना लाऊन देशाबाहेर पळालेला मद्यसम्राट विजय माल्या सध्या भलताच चर्चेत आहे. खरे तर चर्चा आणि माल्या हे समिकरण नवे नाही. पण, सध्या तो ज्यामुळे चर्चेत आहे ते कारण काहीसे भलतेच आहे. विजय माल्ल्या चक्क लग्नाच्या बोहल्यावर चढतोय. होय, आणि ते सुद्धा थेट तिसऱ्यांदा. अर्थात माल्याकडून याबाबत अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रीया आली नाही. पण, त्यांच्या या कथीत लग्नाची चर्चा मात्र जोरदार आहे. प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तांनुसार विजय माल्या हा पिंकी लालवानीसोबत विवाह करणार आहे. पिंकी लालवाणी ही ही एअरलाईन्सची हवाई सुंदरी राहिली आहे. पण, तिची इतकीच ओळख पुरेशी नाही. ती किंगफिशरच्या जाहिरातीमध्ये मॉडेल म्हणूनही झळकली आहे.


माल्ल्या-पिंकीच्या नात्याला मैत्रिचा बहर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंकी लालवाणी आणि विजय माल्या यांची ओळख २०११मध्ये झाली. या ओळखभेटीत पिंकीच्या व्यक्तिमत्वाने माल्या भलताच प्रभावित झाला. त्याने तिला जॉबची ऑफर दिली. पिंकीने ही ऑफर स्विकारली नसती तरच नवल. जॉबची ऑफर स्विकारल्यावर माल्या आणि पिंकी लालवाणी यांच्यात मैत्रिचे नाते निर्माण झाले. दिवसेंदिवस या नात्याला अधिकच बहर येत होता. पुढे पुढे तर हे नाते इतके बहरले की, मैत्रीच्या या नात्याला रिलेशनची किनार लाभली.


माल्ल्याला लागले तिसऱ्या लग्नाचे डोहाळे


विजय माल्ल्याचे पहिले लग्न समीरा तय्यबजी यांच्यासोबत झाले आहे. पण, १९९३ मध्ये माल्ल्याने दुसरे लग्न केले. हे लग्न त्याने आपली लहानपणीची मैत्रिण रेखा माल्ल्या हिच्यासोबत केले. रेखा ही अद्यापही कायदेशिररित्या माल्ल्याची पत्नी आहे. आगोदरच्या लग्नापासू माल्ल्याला तीन मुलेही आहेत. पहिला मुलगा सिद्धार्थ माल्ल्या तर, दोन मुली लिएना आणि तान्या. माल्याच्या आगोदर रेखाचीही दोन लग्ने झाली होती. रेखाचेही कबीर आणि लैला अशी दोन मुले आहेत. दरम्यान, लग्नानंतर माल्ल्याने लैलाला दत्तक घेतले होते.


पडत्या काळातही पिंकीने दिली माल्ल्याला साथ


दरम्यान, इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, विजय माल्ल्या आणि पिंकीने आपल्या रिलेशनशिपची तिसरी अॅनिवर्सरी साजरी केली होती. प्रसारमाध्यमांतून आलेल्या अनेक वृत्तांनुसार, पिंकी लालवानीला नुकतेच विजय माल्ल्याच्या आईसोबत स्पॉट करण्यात आले होते. तसेच, माल्ल्याच्या परिवारासोबतही पिंकीचे चांगले संबंध आहेत. पिंकी विजय माल्ल्याच्या पडत्या काळात त्याच्या सोबत राहिली आहे. इतकी की, बॅंक घोटाळा प्रकरणात इतके आरोप आणि कायदेशिर लकडा मागे लागूनही तीने विजय माल्ल्याची साथ सोडली नाही.


६२ वर्षीय विजय माल्ल्यावर भारतातील बॅंकांमध्ये सुमारे ९ हजार कोटी रूपयांची फसवणूक केल्या प्रकरणी आणि मनी लॉन्ड्रींग प्रकरणी खटला सुरू आहे. विजय माल्ल्याचे इग्लंडमधून भारतात प्रत्यार्पण करण्याबाबत वेस्टिमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात सुनाननी नुकती पूर्ण झाली. माल्या २ एप्रिलपर्यंत जामीनावर बाहेर आहेत.