Mansukh Hiren Death Case : कोण आहेत सचिन वाझे? ज्यांच्या अटकेची फडणवीसांकडून मागणी
सचिन वाझेंमुळे विधानभवनात गदारोळ
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मंगळवारी विधानभवनात मनसुख हिरेन प्रकरणात (Mansukh Hiren Death Case पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांच्या अटकेची मागणी केली आहे. विधानसभेत मनसुख हिरेन प्रकरणासंदर्भात चर्चा करत असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis demands arrest of police officer Sachin Waze in Mansukh Hiren Death Case) यांनी आयपीसी कलम 201 अंतर्गत सचिन वाझे यांना अटक का केली नाही? असा प्रश्न विचारला.
'सचिन वाझे यांना कोण वाचवत आहे?' असा थेट सवाल भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विचारला. सचिन वाझे मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या संशयीत कारचा तपास करत आहेत. देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा आरोप सचिन वाझेंवर केला आहे. तसेच त्यांच्या अटकेची मागणी देखील केली आहे. या अगोदरही अनेकदा सचिन वाझे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आले आहेत. (Mansukh Hiren Death : फडणवीसांनी उल्लेख केलेले धनंजय गावडे कोण?)
कोण आहेत सचिन वाझे?
सचिन वाझे हे 1990 च्या बॅचमधील पोलीस अधिकारी असून एनकाऊंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत. सचिन वाझे यांना 2004 साली सत्य लपवण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. 2002 साली घाटकोपरमधील बॉम्ब विस्फोट प्रकरणात ख्वाजा युनूसला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,'युनूसला औरंगाबादला नेत असतानाच तो फरार झाला.' मात्र सीआयडी चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. युनूसचा मृत्यू हा पोलिसांच्या ताब्यात असतानाच झाल्याचं स्पष्ट झालं. 2004 साली सचिन वाझे या प्रकरणात प्रमुख भूमिकेत असल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलं.
शिवसेनेत केला होता प्रवेश
2008 मध्ये सचिन वाझे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचा तांत्रिक बाबींचा अभ्यास चांगला होता. त्यांनी 2010 साली 'लाल बिहारी' नावाचं नेटवर्किंग सुरू केलं. सचिन वाझे यांनी आपल्या करिअरची सुरूवात पुण्यातून केली होती. तसेच सचिन वाझे यांनी "शीना बोरा हत्या प्रकरण' आणि 'डेविड हेडली' यावर पुस्तकं लिहिलं होतं.