Sharad Pawar Retirment : शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे पवारांचा उत्तराधिकारी कोण या चर्चा सुरु झाल्यात. पवारांचा उत्तराधिकारी म्हटलं की प्रामुख्यानं दोनच नावं समोर येतात.. एक म्हणजे पवारांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि दुसरं नाव म्हणजे शरद पवार यांचे पुतणे अजित पवार (Ajit Pawar)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार
अजित पवार-शरद पवार यांचं काका-पुतण्याचं नातं आहे. अजित पवारांचा राजकारणाचा कल हा या कायम राज्याच्या राजकारणाकडे राहिलाय. बारामती मतदारसंघातून (Baramati Constituency) अजित पवार दरवेळी विक्रमी मताधिक्यानं राजकारणातून निवडून येतात. त्यांची प्रशासनासह पक्षबांधणीतही अजित पवारांचा हातखंडा आहे. अजित पवारांना मानणारा वर्ग पक्षात आहेत,. तरीही मला दिल्लीच्या राजकारणात रस नाही असं अजित पवारांनी बोलून दाखवलंय..


सुप्रिया सुळे
पवारांच्या उत्तराधिकारी म्हणून दुसरं नाव समोर येतं ते म्हणजे सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार आहेत. दिल्लीच्या राजकारणात काम करण्याचा त्यांचा अनुभव आहे. आपल्याला राज्यात परतायचं नाही, दिल्लीतच काम करणं पसंद असल्याचं विधान सुप्रिया सुळेंनी केलं होतं. शरद पवारांच्या कन्या म्हणूनही पवारांच्या राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.


शरद पवारांचा उत्तराधिकारी कोण अशी चर्चा सुरु झाली की सुप्रियाताई दिल्लीत आणि अजितदादा राज्यात अशी वाटणी होईल अशा वावड्या उठायच्या. आता पवारांनी निवृत्तीची घोषणा केलीय आणि आपल्या निर्णयावर ते ठाम आहेत. त्यामुळे पवारांचा उत्तराधिकारी कोण असेल यावर नजीकच्या काळात निर्णय होण्याची शक्यता आहे. 


समिती ठरणावर नवा अध्यक्ष
निवृत्तीची घोषणा करतानाच शरद पवार यांनी नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठी एक समिती गठीत करावी अशी विनंती केली. याचबरोबर त्यांनी या समितीत कोणते सदस्य असतील याची संभाव्य नावही त्यांनी जाहीर केली. ही समिती  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड करेल. 


समितीतील संभाव्य नाव
प्रफुल्ल पटेल, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे,  सुनील तटकरे, के. के. शर्मा, पी. सी. चाको, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन या संभाव्य लोकांचा या समितीत समावेश असेल. निवृत्त होण्याचा निर्णय घेतला तरी मी पक्षात असणारच आहे, फक्त पदावर असणार नाही एवढंच म्हटलंय, असं शरद पवार यांनी म्हटलंय.