अमित जोशी, झी २४ तास, मुंबई :  पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धारेवर धरलं आहे. याबाबतीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, "सचिन वाझे यांना आता वकिलाची गरज नाही, त्यांना वकील मिळालेले आहेत आणि त्या वकिलांचं नाव हे उद्धव ठाकरे आहेत", अशी टीका फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन वाझे यांची बाजू घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसत आहेत, सचिन वाझे याच्याकडे काय अशी मोठी माहिती आहे की, ज्यामुळे उद्धव ठाकरे सरकार कोसळणार आहे, हे मला समजत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


सचिन वाझे याची चौकशी आणि अटकेची मागणी केल्यानंतरच खासदाराच्या आत्महत्येचं प्रकरण पुढे आणलं गेल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. हे लबाडांचं सरकार आहे, आणि जनतेचे लचके तोडण्यासाठी एकत्र आलेल्याचं सरकार असल्याची टीका देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.


सुरूवातीला संजय राठोड आणि नंतर सचिन वाझे यांच्या प्रकरणी सरकारला विरोधकांनी टार्गेटवर ठेवलं आहे.