सात एअरबॅग्ज असतानाही सायरस मिस्त्री यांना का गमवावा लागला जीव?
सायरस मिस्त्री हे मर्सिडीज कारमधून प्रवास करत होते. अपघात झाल्यानंतर एअर बॅग्ज उघडल्यानंतर ही त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे रविवारी दुपारी एका रस्ते अपघातात निधन झाले. ज्या गाडीने ते मुंबईला येत होते त्या कारची किंमत 68 लाख रुपये आहे. मर्सिडीज जीएलसी 220 डी 4 मॅटिकमध्ये ते अहमदाबादहून मुंबईला येत होते. मर्सिडीजच्या GLC 220d सीरीजमधील ही कार अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. यात सात एअरबॅग आहेत. पण असे असताना ही सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला.
सायरस मिस्त्री यांच्या अपघातात वाहनाचा वेग खूप जास्त असण्याची शक्यता आहे. अपघाताच्या वेळी वाहनाचा वेग सुमारे 125 ते 150 किमी प्रतितास असावा असा अंदाज वर्तवला आहे. ओव्हर टेक करताना गाडी दुभजकाला धडकली. मात्र धडक इतकी जोरदार होती की त्यांना गंभीर दुखापत झाली. वेगामुळे मृतदेह कारच्या बाहेर फेकले गेले. बोनेटचा खालचा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता.
मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू सारख्या कार जर्मनी सारख्या देशात 300 किमी प्रतितास वेगाने धावतात, परंतु भारतात त्यांची वेग मर्यादा 240 किमी प्रतितास आहे. यापेक्षा जास्त वेगाने ही वाहने भारतात चालवता येत नाहीत.
या मर्सिडीज कारमध्ये सात एअरबॅग होत्या, तरीही सायरस मिस्त्री यांचे प्राण वाचू शकले नाहीत. आतापर्यंतच्या सर्व रस्ते अपघातांमध्ये एअरबॅगने अनेकांचे प्राण वाचवले आहेत, परंतु एअरबॅगच्या सुरक्षिततेला मर्यादा आहेत. अपघातानंतर एखादी व्यक्ती कारमधून पडली तर एअरबॅग त्यांना वाचवू शकत नाही.
सीट बेल्टमुळे कारमधील लोकांना अंतर्गत जखमा झाल्या, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अपघातात एअरबॅग उघडल्या गेल्या, त्यामुळे त्याचे डोके डॅशबोर्डला लागले नाही. मात्र, विंडस्क्रीनची अवस्था पाहता चालक आणि सहप्रवाशाचे डोके विंडस्क्रीनला आदळल्याचे दिसते, मात्र ही बाब तपासानंतरच कळेल.