मुंबई : पुण्यातील मनसेचे पदाधिकारी वसंत मोरे हे ठाण्यात राज ठाकरे यांच्या आधी भाषण करणार आहेत. मनसेकडून वसंत मोरे यांना हा मान देण्यात आला आहे. वसंत मोरे हे राज ठाकरे यांच्या मशीदीवरील भोंगे आणि त्याच्याविरोधात भोंग्यावर लावल्या जाणाऱ्या हनुमान चालिसा या भूमिकेवर नाराज होते, त्यांना पदावरुन हटवण्यात आलं, यानंतर त्यांना सर्वच पक्षांनी आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली पण ते मनसेतच राहणार यावर ठाम राहिले.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वसंत मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना थेट मुख्यमंत्र्यांनी देखील शिवसेनेत या अशी ऑफर दिली, पण तरीही ते मनसेतच राहणार यावर ठाम राहिले.



 


यानंतर वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांनी मुंबईत आपल्या घरी बोलावून त्यांची अडचण समजून घेतली आणि त्यावर आपली भूमिका देखील समजवली. राज ठाकरे यांनी मनसेसोबत आणि त्यांच्या नेतृत्त्वावर वसंत मोरे यांनी जी इमानदारी दाखवली त्याचं कौतुक केलं, आज वसंत मोरे हे मनसेची सभा सुरु होईल, तेव्हा पहिलं भाषण करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.