मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्यात सतत भर पडत आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आहे. अशात उद्योगांचे स्वागत करण्यास महाराष्ट्र उशिर का करतोय का? असा प्रश्न भाजपानेते माजी मंत्री आमदार अँड आशिष शेलार यांनी उपस्थितीत केला आहे. चीन सारख्या देशातून बाहेर पडणाऱ्या उद्योगांना रेड कार्पेट घालण्यास महाराष्ट्र उशिर का करतोय? राज्याच्या अर्थकारण, रोजगार या दुष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयाला केवळ एक कमिटी गठीत करुन "शासकीय लाल फितीत" का गुंडाळून ठेवताय? तातडीने निर्णय का घेत नाही, असे प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थितीत केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारने या बदलत्या परिस्थिती नुसार तातडीने बदल आणि नवी धोरणे आखायला सुरुवात करताच उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक या राज्यांनी जुने कायदे बदलण्यात आघाडी घेतली. सध्याचे उद्योग टिकतील व नवे उद्योग आकर्षीत होतील असे नवे धोरण व पोषक वातावरण तयार करण्यास सुरुवात केली असल्याचं देखील सांगितले.


वास्तविक महाराष्ट्र हे औद्योगिक दुष्ट्या प्रगत राष्ट्र म्हणून ओळखले जाते, अशावेळी महाराष्ट्र सर्वात आधी पुढाकार घेते. पण यावेळी महाराष्ट्राने याबाबत उशीर केल्याचं  आशिष शेलार यांचे म्हणणे आहे. 
त्याचप्रमाणे वास्तविक अन्य राज्यांची सुरू झालेली स्पर्धा पाहता यामध्ये झालेला कोणताही विलंब महाराष्ट्राचे मोठे नुकसान करणारा ठरणार आहे. 


त्यामुळे तातडीने अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणून राज्य शासनाने या विषयात काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सांगितले आहे. राज्यातील उपलब्ध साधने, कायदे आणि बेरोजगार तरुणांची संख्या त्यांच्याकडे असणारे कौशल्य या सगळ्याचा सखोल विचार करुन नवे धोरण जाहीर करा, तसेच महाराष्ट्राची बाजू जागतिक औद्योगिक व्यासपीठावर मांडण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करा, अशी विनंती देखील आमदार अँड आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना केली.